ठाणे, पुढारी वृत्तसेवा : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. याबरोबरच जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आले होते. विरोधकांनी आंदोलने करीत आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
दरम्यान, अनावधानाने माझ्याकडून माझ्या बाबाचा फोटो नकळत फाडला गेला, ही अत्यंत गंभीर चूक असल्याचे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तमाम नागरिकांची नतमस्तक होऊन माफी मागितली आहे. तसेच आंबेडकरी अनुयायीही मला माफ करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्यांच्या घराभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी स्वत: मनुस्मृतीचे दहन केले होते. तेव्हा सांगितले होते. मनु हा विषमत्तेचा, चातुर्वण्याचा, स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे, अशा मनुचा शालेय पुस्तकात समावेश होणे हे आम्हाला मान्य नाही. याचेच अनुकरण करत आव्हाड हे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करत होते. ते करीत आमच्याकडून अनावधनाने मनुस्मृतीचे पुस्तक फाडले जात असताना, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला गेल्याचे दिसत आहे. ही आमची अक्षम्य चुकी आहे. त्यामुळे या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरीकांची लीन होऊन, नतमस्तक होऊन माफी मागतो. हे प्रकरण माझ्या हृदयाला लागले आहे. मी माझ्या आयुष्यात एकदा भुमिका घेतली की माफी मागत नाही, पण मी ज्या अर्थी माफी मागत आहे, त्या अर्थी ते मी मनापासून बोलत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करा, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हेही वाचा :