Pudhari Maha Icon 2026: ‘पुढारी’ समूहाचा जीवनगौरव पुरस्कार ही प्रोत्साहन देणारी बाब : डॉ. अनिल काकोडकर

Anil Kakodkar Maha Icon Award: डॉ. काकोडकर यांनी ‘पुढारी’ माध्यम समूहासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
Anil Kakodkar Pudhari Mahaicon
Anil Kakodkar Pudhari MahaiconPudhari
Published on
Updated on

Pudhari Maha Icon 2026 Anil Kakodkar

मुंबई : देश आणि समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या ‘पुढारी’ माध्यम समूहाकडून जीवनगौरव पुरस्कार मिळणे ही प्रोत्साहन देणारी बाब असल्याची भावना, प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली. गुरुवारी मुंबईतील ‘आयटीसी ग्रँड मराठा हॉटेल’च्या सभागृहात झालेल्या भव्य आणि हृद्य सोहळ्यात ‘महा आयकॉन जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. काकोडकर बोलत होते.

यावेळी डॉ. काकोडकर यांनी ‘पुढारी’ माध्यम समूहासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि माझा परिचय जुना आहे. जेव्हा मी शिवाजी विद्यापीठाच्या बैठकांसाठी वरचेवर कोल्हापूरला जायचो तेव्हा त्यांची भेट व्हायची. तेव्हा त्यांच्याकडून ‘पुढारी’ माध्यम समूहाचा इतिहास आणि सुरू असलेल्‍या कार्याची माहिती मिळायची. आज त्याची एका अर्थाने उजळणी झाल्याचे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

डॉ. काकोडकर म्हणाले, बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या जडणघडणीत महत्त्‍वाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतरच्या काळात सतत चालणाऱ्या सामाजिक सुधारणांच्या कामात अनेक वर्तमानपत्रांनी आपले जे योगदान दिले त्या सर्वात ‘पुढारी’ माध्यम समूहाचे योगदान खूप मोठे आहे. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या प्रवासाची सुरुवात करणारा ‘पुढारी’ आता सगळीकडे पसरला आहे, तो सर्वदूर मिळतो आहे. देश आणि समाजाच्या जडणघडणीत असे मोठे योगदान देणाऱ्या ‘पुढारी’ माध्यम समूहाकडून असा जीवनगौरव पुरस्कार मिळणे ही प्रोत्साहन देणारी बाब असल्याची भावना डॉ. काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news