Balasaheb Thackeray Trauma Care Hospital : 'ट्रॉमा'तील आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर !

१७ पैकी ६ डॉक्टर कामावर; सीटी स्कॅनही बंद
Balasaheb Thackeray Trauma Care Hospital
Balasaheb Thackeray Trauma Care Hospitalpudhari photo
Published on
Updated on

मुंबई :जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचा समोर आले आहे. रुग्णालयात मंजूर १७ डॉक्टरांच्या पदांपैकी केवळ ६ डॉक्टर कार्यरत असल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातच २५ एप्रिल २०२६ पासून सीटी स्कॅन यंत्रणा बंद असून, डायलिसिस तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांना दाखल न करण्याचे अंतर्गत पत्रही समोर आल्याने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रुग्णालयात सोनोग्राफी सेवा सुरू असली तरी २५ एप्रिल २०२६ पासून सीटी स्कॅन यंत्रणा बंद असल्याने गंभीर जखमी रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवावे लागत असल्याचा आरोप आहे. ट्रॉमा रुग्णालयात सीटी स्कॅनसारखी अत्यावश्यक सुविधा दीर्घकाळ बंद राहिल्याने उपचारात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Balasaheb Thackeray Trauma Care Hospital
BMC Hospitals : एमआरआय, सिटीस्कॅन सेवेचेही कंत्राटीकरण!

डायलिसिस तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे डायलिसिस सुविधा तात्पुरती बंद असल्याचे आणि डायलिसिसची आवश्यकता असलेल्या रुग्णांना दाखल करू नये, असे संबंधित विभागाने अंतर्गत पत्राद्वारे कळविल्याचे दस्तऐवज समोर आले आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाच्या रुग्णांनाही मोठा फटका बसत आहे. एकीकडे डॉक्टरांची कमतरता, दुसरीकडे सीटी स्कॅनसारखी महत्त्वाची सुविधा बंद आणि डायलिसिस सेवा ठप्प असल्याने मुंबईतील महत्त्वाच्या ट्रॉमा रुग्णालयातील आरोग्यसेवा गंभीर अडचणीत आल्याचे चित्र असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला

दरम्यान, डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळला असून, सर्व डॉक्टर बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवत असल्याचा दावा केला आहे. मात्र, काही डॉक्टर बायोमेट्रिक हजेरी लावल्यानंतर खासगी रुग्णालयात सेवा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात काही डॉक्टरांच्या खासगी संकेतस्थळांवरील ओपीडीच्या वेळा आणि ट्रॉमा रुग्णालयातील शासकीय वेळा एकाच असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र या आरोपांची पुष्टी झालेली नाही.

Balasaheb Thackeray Trauma Care Hospital
Medical Negligence: वाघोलीत धक्कादायक आरोप! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू

रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिनची ट्यूब खराब झाल्याने ती बदलण्यात आली होती. एक पार्ट निकामी झाला असून तो लवकरच बदलण्यात येणार आहे. त्यामुळे सीटी स्कॅन सेवा तात्पुरती बंद ठेवावी लागली. डायलिसिस विभागातील तंत्रज्ञ एक दिवस रजेवर असल्यामुळे त्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

डॉ. शैलेश मोहिते, संचालक, महापालिका प्रमुख रुग्णालय

१७ पैकी ६ पदे भरली असून ११ पदे रिक्त असल्याचे स्पष्ट केले. यासाठी, वारंवार पाठपुरावा ही केला जात असल्याचे सांगितले. तसेच सिटीस्कॅन चा तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जात आहे. -

डॉ. छाया शिंदे, अधिष्ठाता, ट्रॉमा रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news