

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सणानिमित्त मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे आज (मंगळवार) २९ हजार रुपये बोनस जाहीर झाला. त्यामुळे यंदाची दिवाळी एक लाख पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी गोड होणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा बोनसमध्ये ३ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. (Diwali Bonus)
अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही २९ हजार रुपये, महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणसेवक २९ हजार रुपये, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित-विनाअनुदानित) २९ हजार रुपये, माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित व विनाअनुदानित) २९ हजार रुपये, अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित) २९ हजार रुपये, अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित व विनाअनुदानित) २९ हजार रुपये, सामाजिक आरोग्य स्वयंसेविका भाऊबीज भेट रुपये १२ हजार रुपये, बालवाडी शिक्षिका, मदतनीस भाऊबीज भेट ५ हजार रुपये.