

मुंबई : सणासुदीच्या काळात अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. याअंतर्गत भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यामुळे ४८ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. १,४३१ दुकानांविरुद्ध नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अन्न आणि औषध प्रशासनाने ११ ऑगस्टपासून महाराष्ट्र महोत्सव, अन्न सुरक्षेचा संकल्प ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे. सदर मोहीम २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या मोहिमेअंतर्गत ३,४८५ दुकानांमधून दुग्धजन्य दूध, मावा, तूप, खाद्यतेल, मिठाई, सुकामेवा आणि चॉकलेट इत्यादी अन्नपदार्थांचे ४,६७६ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांच्या चाचणी अहवालात अनेक अन्नपदार्थांची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे आढळून आले. काही अन्नपदार्थांमध्ये लेबल दोष इत्यादी अनियमितता आढळून आल्या आहेत.
राजेश नार्वेकर, एफडीए आयुक्त