Santosh Deshmukh case : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला बेड्या

कारवाईनंतर चौकशीसाठी मुंबईत आणले
Ranjit Kasle arrested
Santosh Deshmukh case : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला बेड्याCrime File Photo
Published on
Updated on

Dismissed police sub-inspector Ranjit Kasle arrested

मुंबई : पुढारी वृतसेवा

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला संपविण्यासाठी सुपारी मिळाल्याचा दावा करून खळबळ उडवून देणारा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला दिल्लीतून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

Ranjit Kasle arrested
Mumbai News : मुंबई उपनगरांसाठी १०८६.७५ कोटींचा निधी

जातीय द्वेष पसरविणे, सार्वजनिक अधिकार्‍यांची बदनामी करणे आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. बीड जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या रणजीत कासले याने वाल्मिक कराडला संपविण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला होता.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करून त्याने पोलीस दलाची बदनामी केली होती. दरम्यान, त्याने एका राजकीय नेत्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. शुक्रवारी रणजीत कासले याला दिल्लीतून अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news