Devendra Fadnavis : महाराष्ट्र देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर
Fadnavis on investment growth
महाराष्ट्र देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्यpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : लंडन म्हटले की ब्रिटन आठवते, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत, अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळासमोर महाराष्ट्रातील विकासकामांची माहिती दिली. तसेच, ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी द़ृढ व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असल्याचे ते म्हणाले.

हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

Fadnavis on investment growth
Gold Price Diwali: दिवाळीत सोन्याचा दर जाणार दीड लाखांवर,कारण काय?

राज्य सरकार ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरण राबवत आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या लवकर सोडविण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून, दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशांतील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन केली असून, दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. देशाच्या शिक्षण क्षेत्रात नवे धोरण राबविले असून, परदेशी विद्यापीठांसाठी प्रवेशद्वार खुले केले आहे. त्यांतर्गत राज्यात नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’ उभारण्यात येत आहे, ज्यामध्ये लंडन विद्यापीठाचा कॅम्पसही असेल. येथे दोन हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, सी-लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास होत आहे. वाढवण बंदर विकसित केले जात असून, बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून हा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सौरऊर्जेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात डेटा सेंटर, एआय आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी पुण्यात विशेष व्यवस्था उभारली जात आहे. स्किल विद्यापीठांमार्फत आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर तज्ज्ञ घडविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फिनटेक आणि फायनान्स कंपन्यांचे माहेरघर म्हणजे मुंबई आहे. ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी द़ृढ व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Fadnavis on investment growth
Dawood Ibrahim: मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधात कारवाई, सलीम डोलाच्या 8 ठिकाणांवर कारवाई

ब्रिटिश शिष्टमंडळातील सदस्यांनीही महाराष्ट्रातील वेगाने वाढणार्‍या उद्योग क्षेत्राबद्दल समाधान व्यक्त करत एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. तसेच, राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करून राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचेही सदस्यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्टार्टअप्समध्येही आघाडीवर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे ईव्ही हब बनत आहे. नागपूर सोलर मॉड्युल उत्पादन केंद्र बनत आहे, तर पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर विकासामुळे भारत आज गुंतवणूकस्नेही देश बनला असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता वाढल्याचे नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news