Devendra Fadnavis: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहणार

अजित पवारांच्या सन्मानार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या 22 प्रचारसभा रद्द; स्थानिक नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारी
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisFile photo
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र अद्यापही सावरलेला नाही. या कठीण काळात आपल्या सहकाऱ्याला श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री स्वतः कोणताही प्रचार करणार नाहीत. अजित पवारांच्या सन्मानार्थ त्यांनी आपल्या सर्व 22 प्रचारसभा रद्द केल्या आहेत.

CM Devendra Fadnavis
Piyush Goyal NCP statement: प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याची माहिती चुकीची – पीयूष गोयल यांचा यू-टर्न

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निवडणुकांचा प्रचार स्थानिक नेते आणि पदाधिकारी सांभाळणार आहेत.

CM Devendra Fadnavis
Rohit Shetty house firing: जुहूमध्ये रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; पुण्यातून अटकेला गेले पाच आरोपी

देवगिरीवर सुनेत्रा पवार यांची भेट

सुनेत्रा पवार यांनी शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी सुनेत्रा पवारांशी सविस्तर चर्चा केली आणि कठीण काळात महायुतीचे सरकार पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news