MHADA real estate scam : विकासकांनी केली म्हाडाची 121 कोटींची फसवणूक; तक्रार दाखल

संक्रमण गाळ्यांचे भाडे थकवले
MHADA real estate scam
विकासकांनी केली म्हाडाची 121 कोटींची फसवणूक; तक्रार दाखल pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : म्हाडाकडून भाड्याने घेतलेल्या संक्रमण गाळ्यांचे भाडे विकासकांनी थकवले असून या प्रकरणी म्हाडाची तब्बल 121 कोटींची फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱ्या विकासकांविरोधात म्हाडाने खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उपकरप्राप्त इमारतींचा विकास खासगी विकासकांमार्फत सुरू असताना तेथील रहिवाशांना राहण्यासाठी म्हाडाचे संक्रमण गाळे उपलब्ध करून दिले जातात. याचे भाडे विकासकाने म्हाडाला देणे अपेक्षित असते. हे भाडे अनेकदा विकासक देत नाहीत. त्यामुळे म्हाडाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे.

MHADA real estate scam
Iran war impact dry fruits : ड्रायफ्रुट महागले,पण आखाती युद्धाचा काय संबंध?

गेल्या काही वर्षांत भाडे थकवणाऱ्या विकासकांना दंड आकारण्यात आला आहे. काहींना बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. आता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे पाऊल म्हाडाने उचलले आहे.

नाइन एम इन्फ्रास्ट्रक्चर, नाखवा ॲण्ड जसोल डेव्हलपर्स एलएलपी, प्रदीप गोरा गांधी, जे. के. बिल्डर्स व इतर काही विकासकांविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विकासकांना 1996 ते 2021 या कालावधीत म्हाडाचे संक्रमण गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.

MHADA real estate scam
Jaykumar Gore : भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल

या गाळ्यांसाठी विकासकाने काही काळ भाडे भरून म्हाडाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर भाडे भरणे बंद केले. अशाप्रकारे विकासकांनी 121 कोटी 53 हजार 105 रुपये इतकी भाड्याची रक्कम थकवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news