मुंबई : Maharashtra Assembly Polls | आचारसंहिता लागू होताच विधानसभा निवडणुकांचा आमच्यासाठी 'शंखनाद' झाला तर काहींसाठी मात्र 'ऐलान' झाले, असा टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
महाविकास आघाडीचे स्थगिती सरकार गेल्यावर राज्यात 'गती आणि प्रगती'चे सरकार आले हे महाराष्ट्राने अनुभवले. सव्वा दोन वर्षात महायुतीने अत्यंत गतिमान कारभार करत राज्याला प्रगतिपथावर नेले असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्ष निवडणुकीआधीच पूर्णतः खचला आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजना बंद करायला निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर सभेत सत्ता आल्यास योजना बंद करण्यात येईल, असे सांगितले आहे. पण, महाराष्ट्राला पुन्हा कुलूपबंद करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. एकीकडे आमच्या लाडकी बहिणी योजनेवर टीका करतात आणि दुसरीकडे दीड हजाराचे दोन हजार करू म्हणतात, कर्जमाफी करू असे म्हणतात. त्यामुळे त्यांनी आधी काय म्हणायचे ते ठरवावे. आम्ही सत्तेवर आल्यावर जाहीर केलेल्या सर्व योजना चालवू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले, ज्यांच्या काळात उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवले गेल, ते उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच मनसुख हीरेनला मारुन टाकले, तेच आता आम्हाला कायदा-सुव्यवस्था सांगायला निघाले आहेत, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी चढविला.
सिंचन क्षेत्रात सरकारने अभूतपूर्व काम केले असून सव्वादोन वर्षात आम्ही १४५ प्रकल्पांना मान्यता दिली. सुमारे २२ लाख हेक्टर सिंचन सुविधा त्यातून निर्माण होईल. वैनगंगा मळगंगा, नार-पार-गिरणा, दमणगंगा-पिंजाळ, दमणगंगा-एकदरे असे नदीजोड प्रकल्प आम्ही मंजूर केले असून दुष्काळी मराठवाड्याला त्यामुळे पाणी मिळणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय अमलात आला आहे. आता दिवसा वीज देण्याचे संपूर्ण नियोजन केले आहे. येत्या काळात दिवसा वीज मिळेल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्ही एक लाखावर उद्योजक निर्माण केले. वाढवण बंदराचा जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये समावेश होणार आहे. या बंदरावर राज्य आणि देशाची पंचवीस तीस वर्षे अर्थव्यवस्था चालेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.विरोधक गुजरातचे ब्रँड अॅम्बॅसिडर • महाराष्ट्रात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात येते आणि तरीही विरोधक गुंतवणूक गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप करतात. राज्य उद्य- ोगात पुढे असतानाही ते गुजरात पुढे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे खरे तर महाविकास आघाडी हीच गुजरातची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
महाराष्ट्रात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात येते आणि तरीही विरोधक गुंतवणूक गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप करतात. राज्य उद्य- ोगात पुढे असतानाही ते गुजरात पुढे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे खरे तर महाविकास आघाडी हीच गुजरातची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.