High Court : पतीसोबत शारीरिक संबंधाला नकार देणे, अपमान करणे छळच

हायकोर्ट; घटस्फोटाला आव्हान देणारी पत्नीची याचिका फेटाळली
High Court
High Courtfile photo
Published on
Updated on

मुंबई : पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करणे तसेच पतीचा मित्रांसमोर अपमान करणे हा पत्नीने केलेला छळ आहे. यातून क्रूरता सिद्ध होते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आणि घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणारे महिलेचे याचिका फेटाळली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला.

पत्नीने पतीचा त्याच्या मित्रांसमोर अपमान करणे आणि त्याच्या कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करणे हा पतीला मानसिक त्रास देण्याचाच प्रकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. पुण्यातील कुटुंब न्यायालयाने क्रूरतेच्याआधारे पतीला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट मंजूर केला होता. त्या आदेशाला महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते आणि वैवाहिक हक्क परत मिळवून देण्याची विनंती केली होती. तिच्या अपिलावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.

यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर पत्नीनेच पतीचा छळ केल्याच्या वस्तुस्थितीवर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. पती हा त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायाचा एक भाग आहे. पत्नीने पतीच्या कर्मचार्‍यांसोबत केलेले वर्तन नक्कीच पतीला त्रास देणारे आहे. पतीला त्याच्या मित्रांसमोर अपमानित करणे ही ’क्रूरता’ आहे. त्याचबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे आणि पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप करणे ही देखील पत्नीने पतीसोबत केलेली क्रूरता आहे, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news