

मुंबई : दादर टर्मिनस स्थानकाच्या शेजारील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ च्या बाहेर असलेल्या पार्किंगमध्ये बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पार्किंगमध्ये असलेल्या सुमारे १२ ते १५ गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी अग्निशमन उपकरणांचा वापर केल्याने आग अटोक्यात आली.
या भीषण आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने स्थानकातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी अग्निशमन उपकरण वापरुन या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले.