Mumbai Dadar Gas Pipeline Leak: दादरमध्ये गॅस पाईपलाईन फुटली, सुदैवाने जीवितहानी नाही

संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai Dadar Gas Pipeline Leak
Mumbai Dadar Gas Pipeline LeakPudhari
Published on
Updated on

मुंबई: दादर प शिवाजी पार्क परिसरात काल शनिवार दि 30 मे रोजी मनपा कर्मचाऱ्यांकडून वृक्षछाटणी सुरूअसताना अनवधानाने गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai Dadar Gas Pipeline Leak
CNG Price Hike: सीएनजी दरवाढीमुळे प्रवास महागण्याची चिन्हे

खोदकाम सुरू असताना अचानक गॅस पाईपलाईनला धक्का लागून गॅस गळती सुरू झाली. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचरण केले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना काही काळ सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले.

Mumbai Dadar Gas Pipeline Leak
Mumbai Redevelopment Issue: सिद्धिविनायका, 140 बेघर कुटुंबांनाही घर दे रे बाप्पा

जवळपास एक तासाच्या प्रचंड मेहनतीने गॅसगळती रोखण्यात अग्निशमन दलाला यश आले आणि मोठा अनर्थ टळला.या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news