

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावरील लोकल सेवा दोन्ही दिशेने पाच तास तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा 7 तास बंद राहणार आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
सीएसएमटी ते विद्याविहार धिमागती मार्ग
सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत अप आणि डाऊन
डाऊन धिम्यागतीच्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. आणि विद्याविहार स्थानकावर परत डाउन धीम्या गतीच्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद गतीच्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वे
बोरिवली ते राम मंदिर अप आणि डाऊन जलदगती मार्ग
सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर धावतील. सर्व डाऊन जलद मार्गावरील लोकल अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर धावतील. काही अप आणि डाउन उपनगरीय लोकल रद्द केल्या जातील.
हार्बर लाईन
पनवेल ते वाशी अप आणि डाउन
सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत.
पनवेल येथून सीएसएमटीकडे निघणाऱ्या अप हार्बर लाईन लोकल सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत आणि सीएसएमटी येथून बेलापूर, पनवेलकडे जाणाऱ्या डाउन लोकल सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 पर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स-हार्बर
पनवेल ते ठाणे
सकाळी 11.02 ते सायंकाळी 5.53 पर्यंत.
ठाणे येथून पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल सकाळी 10.01 ते सायंकाळी 5.20 पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी मुंबई-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लोकल उपलब्ध राहतील.