Credit Cards | क्रेडिट कार्डधारक झाले दिवाळखोर, हप्ते भरणे झाले जड

खरेदीवरील हप्त्यांची थकबाकी गेली तब्बल २.७ लाख कोटींवर
 Credit Cards
क्रेडिट कार्डPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : 'आत्ता खरेदी करा आणि नंतर पैसे भरा' या घोएपणेवर पत गुंतवणाऱ्या क्रेडिट कार्डधारकांना हप्ते भरणे जड झाले आहे. जून-२०२४ अखेरीस जवळपास २ लाख ७० हजार कोटी रुपयांचे हप्ते थकीत राहिले आहेत. ट्रान्स युनियन सिबिलने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही महिन्यांत थकबाकी सातत्याने वाढताना दिसत आहे. मार्च २०२३ मध्ये थकबाकी १.६ टक्के होती. त्यात मार्च २०२४ पर्यंत १.७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. तर, जून २०२४ अखेरीस थकबाकीचा टक्का १.७ टक्क्यांवर गेला आहे. टक्क्यांमधील वाढ अल्प वाटत असली तरी याची रक्कम प्रचंड आहे. मार्च २०२३ मध्ये थकबाकी २ लाख कोटी रुपये होती, त्यात मार्च २०२४ मध्ये २.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यानंतरच्या तीन महिन्यांत थकबाकीचा आकडा २.७ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. कोविड-१९ पूर्वी मार्च २०१९मध्ये क्रेडिट कार्ड थकबाकीचा आकडा ८७ हजार ६८६ कोटी रुपये होता. याचाच अर्थ गेल्या पाच वर्षांत दरवर्षी सरासरी २४ टक्के दराने थकबाकी वाढली आहे.

मिलेनियल पिढीतील म्हणजेच १९८१ ते १९९६ या कालावधीत जन्मलेल्या व्यक्ती आपले संपूर्ण क्रेडिट वापरून खरेदी करताना दिसत आहेत. ई-कॉमर्स कंपन्यांवर इच्छित खरेदी केल्यानंतर या पिढीतील व्यक्तींची बरीच खाती बुडीत ठरत आहेत. यामुळे बँकांचा निव्वळ तोटा ५ ते ६ टक्क्यांवर गेला आहे. गत तिमाहीत एसबीआय कार्डने क्रेडिट कार्डचा निव्वळ तोटा ७.५ टक्क्यांवर गेल्याचे जाहीर केले असल्याची माहिती बाजार विश्लेषक सुरेश गणपती यांनी सांगितले.

गेल्या दोन दशकापासून बँकांचे किरकोळ कर्ज वितरण वाढले आहे. या कर्ज प्रकाराच्या वाढीचा वेग कॉर्पोरेट कर्जाहून अधिक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) असुरक्षित कर्जाचे धोके वारंवार सांगितले असून, याबाबत सावधानतेचा इशाराही दिला आहे. बरीचशी असुरक्षित कर्जे १० हजार रुपयांच्या आतील आहे. असुरक्षित कर्जवाढीचा वेग वार्षिक २३ टक्के आहे. तर, एकूण कर्ज वितरण वाढीची देशाची सरासरी १२ ते १४ टक्के आहे. तर, बैंक क्षेत्राच्या एकूण कर्जवाढीचा वेग गतवर्षी १५ टक्के राहिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news