

पुढारी ऑनलाईन डेस्क : भरधाव कारने समोरील पुढे उभ्या असलेल्या कारला मागून धक्का दिल्याने नेरुळ येथील पामबीच मार्गावर अपघात घडला. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत असणाऱ्या पत्नी व लहान मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातावेळी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. ओमकार विजय मोरे (वय.26) हा तरुण दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे तपासात समोर आहे. यासोबतच त्याच्या कारमध्ये एक बिअर बॉक्स मिळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.