Cooper Hospital License Suspension : ‘कूपर’च्या रक्तपेढीत गंभीर त्रुटी; ५ दिवस परवाना निलंबित

परिचारिका, वैद्यकीय समाजसेवकांची पदे रिक्त; उपकरण देखभाल नोंदीही अपूर्ण
Cooper Hospital
Cooper Hospitalpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : कूपर रुग्णालयाच्या रक्तपेढीत अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. रक्तपेढीत मंजूर परिचारिका व वैद्यकीय समाजसेवक उपलब्ध नसणे, रक्तदात्यांच्या अर्जांमधील अपूर्ण माहिती, उपकरणांच्या देखभाल नोंदवह्या अद्ययावत नसणे, तसेच रक्तदान शिबिराच्या नोंदी अपूर्ण ठेवणे, अशा बाबींवर एफडीएने आक्षेप नोंदवले आहेत. या त्रुटींमुळे रक्तपेढीचा परवाना २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आला होता.

एफडीएने ४ ऑगस्ट २०२६ रोजी रक्तपेढीची तपासणी केली होती. या वेळी रक्तदात्यांच्या निवड अर्जांची पाहणी केली असता एका अर्जावर रक्तपेढीचे अधिकृत नाव व पत्ता नमूद नसल्याचे, तर अनेक अर्जांमध्ये रक्तदात्यांचे संपूर्ण निवासी व संपर्काचे पत्ते नसल्याचे आढळले. तसेच एलायझा रीडर, एलायझा वॉशर आणि रक्तघटक विभाजनासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रिफ्यूज यंत्राच्या देखभाल नोंदवह्या वेळोवेळी अद्ययावत केल्या जात नव्हत्या.

Cooper Hospital
Private Banks CSR Fund : खासगी बँकांकडून सीएसआर निधीचा गैरवापर

२ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिरातील नोंदीही रक्तपेढीच्या मुख्य नोंदवहीत पूर्ण करण्यात आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे, सिंगल डोनर प्लेटलेट आणि सिंगल डोनर प्लाझ्मा या घटकांच्या निर्मितीसाठी अफेरेसिस प्रक्रिया करण्याची नियामक मान्यता रक्तपेढीला होती. मात्र, तपासणीच्या दिवशी अफेरेसिस यंत्र बंद होते. संबंधित प्रक्रिया अद्याप सुरू केली नसल्याचे रक्तपेढी प्रशासनाने तपासणीदरम्यान सांगितले.

अखेर उगारला कारवाईचा बडगा

रक्तपेढीच्या कामकाजात आवश्यक मनुष्यबळ, नोंदी आणि उपकरणांच्या देखभालीबाबत त्रुटी आढळल्याने एफडीएने कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार रक्तपेढीचा परवाना पाच दिवसांसाठी निलंबित करण्याचा आदेश २८ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला.

Cooper Hospital
Pen Cooperative Urban Bank Scam : ठेवीदारांना मोठा दिलासा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.