Congress MLC Candidates: विधान परिषदेच्या 9 जागांवर काँग्रेसचे उमेदवार

काँग्रेसचे संख्याबळ तुल्यबळ असलेल्या जागेवर काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.
Congress
Congresspudhari photo
Published on
Updated on

मुंबई: विधान परिषदेच्या 9 जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले असून वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या काँग्रेसचे संख्याबळ तुल्यबळ असलेल्या जागेवर काँग्रेसने शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात दिलीप बनसोड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. यवतमाळ मतदारसंघात साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Congress
Maharashtra Politics: पुण्यात निष्ठावंतांना डावलल्याने राष्ट्रवादीत नाराजी

अमरावतीत हर्षदीप देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. नागपूर पोटनिवडणुकीत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लातूर-बीड-धाराशिव मतदारसंघात काँग्रेसने महेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसने रामदास पाटील- सुखटणकर यांना उमेदवारी दिली आहे.

Congress
Ladki Bahin Yojana Scam: पुरुषांनी लाटलेले ‌‘लाडकीं‌’चे पैसे वसूल करू- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तसेच माधवराव पाटील-जळगांवकर यांनी डमी अर्ज भरून ठेवला आहे. सोलापूरमध्ये आदित्य फत्तेपूरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर अहिल्यानगरमधून काँग्रेसचे करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे, तर येथून उद्धव ठाकरे गटाचे मच्छिंद्र धुमाळ यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news