

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याच्या प्रकरणात मुंबईच्या खार पोलिसांनी कॉमेडियन कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कामराला ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुणाल कामराने चौकशीसाठी २ एप्रिलपर्यंत वेळ मागितली होती, मात्र पोलिसांनी त्याला मुदतवाढ नाकारली आणि ठरलेल्या वेळीच उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर आता मोठी चर्चा सुरू झाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.