Navi Mumbai Cocaine Seizure : नवी मुंबईत 1 कोटी 26 लाखांचे कोकेन जप्त

नायझेरियन तस्कर नवी मुंबई पुन्हा सक्रिय; तिघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी
Navi Mumbai Cocaine Seizure
Navi Mumbai Cocaine Seizurepudhari photo
Published on
Updated on

कोपरखैरणे : ‌‘नशामुक्त नवी मुंबई ‌‘अभियानामुळे अमली पदार्थ तस्करीचे नवी मुंबईतील नायझेरियन रॅकेट काही काळ शांत होते. मात्र पुन्हा ते सक्रीय झाल्याचे मंगळवारी अपरात्री गुन्हे शाखेने राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे उघड झाले. तीन नायझेरियन नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 27 लाख 61 हजार 300 रुपयांचे कोकेन जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपींना 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ऑलिवर ओकेचुक्यु उगवु, मादुयाबुकी कॉसमॉस इग्वेओमा आणि ईनोसंट दादा लाविआन्स अशी अटक आरोपींची नावे आहेत. वाशीतील जुहुगाव येथे नायझेरियन नागरिक वास्तव्यास असून ते अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून मंगळवारी रात्री चार ठिकाणी कोम्बींग ऑपरेशन राबवण्यात आले.

Navi Mumbai Cocaine Seizure
Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर दरोडा: आंतरराज्यीय टोळी जेरबंद: १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुहु गाव, सेक्टर-11, वाशी (घर नंबर 522/3) हरियाली निवास येथे केलेल्या कारवाईत नायजेरियन नागरिक ऑलिवर ओकेचुक्यु उगवू याच्याकडून1 कोटी 26 लाख 25 हजार रुपये किंमतीचे व 252.5 ग्रॅम वजनाचे कोकेन व 12 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला हे कोकेन पुरविणाऱ्या मादुयाबुकी कॉसमॉस इग्वेओमा ईनोसंट दादा लाविआन्स यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, संदिप निगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, देवेंद्र ओव्हाळ, पोलीस हवालदार तुषार माने, देशमुख, तायडे, दोरे, पवार, पोलीस नाईक म्हात्रे, पाटील, चव्हाण, धोंडे, खिल्लारे यांच्या पथकाने केली.

Navi Mumbai Cocaine Seizure
Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांकडून १८ कोटी ६३ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news