CIDCO Housing Scheme: सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी एकूण ४,१८० अर्जदारांनी केली नोंदणी; सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला प्रतिसाद

सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेतील तळोजा, खारघर आणि कळंबोली येथील ४,७७९ घरांसाठी ४,१८० अर्जदारांनी नोंदणी केली आहे. ईडब्ल्यूएस नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची संधी.
CIDCO Housing Scheme
CIDCO Housing SchemeFile Photos
Published on
Updated on

नवी मुंबई: सिडकोच्या ऑगस्ट २०२६ गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४,७७९ घरांसाठी एकूण ४,१८० अर्जदारांनी नोंदणी केली आहे. ही घरे नवी मुंबईतील तळोजा, खारघर आणि कळंबोली या नोड्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

येत्या १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्लुएस) घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, पात्र नागरिकांना नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी मिळाली.

CIDCO Housing Scheme
Alibag Dowry Harassment Case: अलिबागमध्ये हुंड्यासाठी विवाहित महिलेचा छळ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

३ सप्टेंबर रोजी बुकिंगची मुदत संपली असून, नागरिकांकडून मिळालेला हा उत्कृष्ट प्रतिसाद सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमावरील वाढता विश्वास अधोरेखित करणारा आहे. प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (पीएमएवाय- यु) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २.५ लाखांचे अनुदान सप्टेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध आहे.

लागू असलेल्या योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वे व पात्रता निकषांच्या अधीन राहून मिळणाऱ्या या अनुदानामुळे पात्र लाभार्थ्यांना घर खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. नागरिकांना स्वतःचे घर घेण्याची संधी अधिक सुलभ व्हावी आणि नियोजित नागरी केंद्रांमध्ये गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सिडकोकडून सातत्याने गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत.

CIDCO Housing Scheme
Pen Ganesh Murti: पेणमधून १६ लाखांहून अधिक गणेशमूर्ती देशविदेशात; १०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल

तळोजा, खारघर आणि कळंबोली हे नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेले नोड्स असून, या परिसरांमध्ये पायाभूत सुविधा आणि संपर्कव्यवस्थेचा विस्तार होत आहे. या योजनेतील लॉटरी अर्जदारांची प्रारूप यादी सिडको होम्सच्या www.cidcohomes.com पोर्टलवर दिनांक ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रारूप यादीबाबतचे आक्षेप ८ सप्टेंबरपर्यंत नोंदविता येतील. अंतिम यादी १० सप्टेंबररोजी प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी प्रक्रिया आणि पुढील टप्प्यांबाबतची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल.

सिडकोच्या गृहनिर्माण योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नवी मुंबईत स्वतःचे घर असावे, या नागरिकांच्या आकांक्षेचे तसेच सिडकोच्या नियोजित विकासावर असलेल्या त्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नागरिकांना नियोजित परिसरात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण घरे उपलब्ध करून देतानाच नवी मुंबईतील वाढत्या पायाभूत सुविधा आणि उत्तम कनेक्टिविटीचा लाभ मिळवून देण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे.

- अश्विन मुद्गल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news