VRF HVAC system Mumbai : पश्चिम रेल्वेच्या इमारतींमध्ये अत्याधुनिक वातानुकूलित प्रणाली

कार्यालयात गर्दीनुसार तापमान स्वतंत्रपणे नियंत्रित होणार; ११ कोटी रुपयांची बचत होणार
VRF HVAC system Mumbai
Railwaypudhari photo
Published on
Updated on

मुंबई : श्रीकांत जाधव

कॉर्पोरेट कार्यालये, आयटी पार्क, पंचतारांकित हॉटेल्स आणि हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी पीएलसी कंट्रोलरवर आधारित व्हीआरएफ डक्टेबल अत्याधुनिक वातानुकूलित प्रणाली पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील हेरिटेज मुख्यालय तसेच कार्यालय इमारतीत प्रायोगिक तत्त्वावर बसवली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रस्तावित नवीन एसी प्रणालीमुळे कार्यालयातील प्रत्येक खोलीत लोकांच्या गर्दीनुसार तापमान स्वतंत्रपणे नियंत्रित केले जाणार आहे. यामुळे वर्षाला जवळपास १,०८७,२५७ युनिट्स वीज बचत होईल असा दावा रेल्वेने केला आहे.

पश्चिम रेल्वेकडून या नवीन व्हीआरएफ डक्टेबल वातानुकूलित प्रणालीची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. यासाठी सुरुवातीला जोडणी खर्च अधिक होतो. मात्र दीर्घकाळ होणारी वीज बचत आणि कमी देखभाल खर्चामुळे ही एक अत्यंत फायदेशीर गुंतवणूक ठरणार आहे. यामुळे वर्षाला १,०८७,२५७ युनिट्स वीज आणि ११ कोटी ९५ लाख ०९ हजार ८३३ रुपयांची बचत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

VRF HVAC system Mumbai
illegal construction demolition : कामोठेतील ‘विवांता’चे चार अनधिकृत मजले तोडले

या नाविन्यपूर्ण उपक्रमास १८ जून २०२६ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. १ वर्षाचा नियोजित कालावधी ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. सुरुवातील प्रायोगिक तत्त्वावर चर्चगेट स्टेशन इमारत आणि जीएलओ इमारतीमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बसण्याच्या जागांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

या नवीन एसी प्रणालीत पीएलसी ऑटोमेशन, नियंत्रित मोटराइज्ड डॅम्पर्स आणि ऑक्युपन्सी सेन्सर्स यांचा संयुक्त मेळ घालून ऊर्जेचा अपव्यय टाळणाऱ्या मुख्य कार्यपद्धतीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पुढील १२ महिन्यांच्या कालावधीत अभियांत्रिकी डिझाइन, खरेदी, प्रत्यक्ष जोडणी असा चार टप्प्यांचा धोरणात्मक आराखडा अंतिम करण्यात आला आहे. वर्षभरात ही सर्व जोडणी पूर्ण केली जाणार आहे.

या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये

  • झोनिंग नियंत्रण : कार्यालयाच्या प्रत्येक खोलीत गरजेनुसार तापमान स्वतंत्रपणे नियंत्रित करता येते.

  • इन्व्हर्टर कॉम्प्रेसर : एसीच्या लोडनुसार ऊर्जेचा वापर कमी जास्त होतो.

  • स्मार्ट सेन्सर्स : कार्यालयात लोक आहेत की नाही. हे ओळखून एसीचा वेग कमी करतो किंवा बंद होतो. ज्यामुळे मोठी ऊर्जा बचत होते.

  • केंद्रीय देखरेख : पूर्ण इमारतीत एसी यंत्रणा एकाच स्क्रीनवरून हाताळता येते.

VRF HVAC system Mumbai
BMC well cleaning : मुंबई मनपाला विहिरींच्या सफाईचा साक्षात्कार !
  • व्हीआरएफ डक्टेबल सिस्टम कॉम्प्रेसरचा वेग गरजेनुसार बदलून रेफ्रिजरेटरचा प्रवाह नियंत्रित करते. डकटेबल युनिट्स छताच्या आत लपवलेले असल्याने खोलीच्या सौंदर्यात कोणताही अडथळा येत नाही.

  • पीएलसी कंट्रोलर हा या प्रणालीचा 'मेंदू' असतो. सेन्सर्सकडून तापमान, आर्द्रता, रिअल-टाइममध्ये एसीच्या कामगिरीचे प्रोग्रामिंगनुसार नियंत्रण करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news