Chief Minister 'Royal' entry | मुख्यमंत्र्यांची विधानभवनात ‘रॉयल’ एंट्री

Chief Minister 'Royal' entry |
Chief Minister 'Royal' entry | मुख्यमंत्र्यांची विधानभवनात ‘रॉयल’ एंट्री
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात आले. येताना फडणवीस यांच्यासमवेत दुचाकी गाड्यांचा कमी ताफा दिसून आला. मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीवरून विरोधकांनी टीका केली आहे. या बुलेटच्या पीयुसीची मुदत संपल्याचे काँगे्रसने म्हटले आहे.

मुख्यमंत्री स्वतः रॉयल एनफिल्ड 350 ही बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. विशेष म्हणजे केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला ताफादेखील यावेळी दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसला.

बुलेटच्या पीयूसीची मुदत संपली : वर्षा गायकवाड

मुंबईतील काँग्रेस नेत्या तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या रॉयल एंट्रीतील चूक शोधून काढली. जी बुलेट वापरली होती, त्या बुलेटच्या पीयुसीची मुदत संपल्याचे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. वर्षा गायकवाड यांनी याची कागदपत्रेही शेअर केली आहेत.

महाजन-चव्हाण यांचा विमान प्रवास : आ. रोहित पवार

मंत्री गिरीश महाजन-रवींद्र चव्हाण यांनी विमान प्रवास केल्याचे फोटो आ. रोहित पवार यांनी पोस्ट करून टीका केली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रवासीयांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे! बहुतेक यांची विमाने हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news