Father Francis Dibrito : ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मुख्यमंत्री शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मुख्यमंत्री शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
Chief Minister Shinde paid tribute to senior literary father Francis Dibrito
सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या श्रद्धांजली वाहिली. Father Francis Dibrito File Photo
Published on
Updated on

मुंबई : सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Chief Minister Shinde paid tribute to senior literary father Francis Dibrito
राधानगरी धरण पूर्ण भरले, धरणाचे चार दरवाजे उघडले!

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणाले की, फादर दिब्रिटो यांनी धर्मप्रांतात शांतता, बंधुभाव, एकात्मता यासाठी काम करताना पर्यावरण प्रेमाची हरित वसई चळवळ उभी केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास आणि त्यातून एकोपा साधण्याचा त्यांचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

Chief Minister Shinde paid tribute to senior literary father Francis Dibrito
केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढ

मराठी साहित्यविषयक चळवळीत पर्यावरणप्रेमी भूमिका घेऊन केलेले लेखन हे त्यांचे वेगळेपण आहे. 'सुवार्ता' या त्यांच्या नियतकालिकाने मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे लेखन मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरले आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. त्यांच्या निधनामुळे अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला आहे. फादर दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुयायांच्या दुःखात सहभागी आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news