मुंबई : पुढारी ऑनलाईन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन त्याची मनोभावे आरती केली. (Lalbaugcha Raja)
राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत असे मागणे त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू चि. रुद्रांश आणि इतर सर्व सहकारी उपस्थित होते.