Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी ताफा थांबवला अन् अपघातात जखमी वृद्ध महिलेला केली मदत

मुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशील स्वभावाचे पुन्हा दर्शन, पाहा व्हिडिओ
Chief Minister Eknath Shinde helped the woman injured in the rickshaw accident
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संवेदनशील स्वभावाचे पुन्हा दर्शन Pudhari Photo

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेकडे ते गेले. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, तसेच आपल्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स आणि आपला अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करायला सांगितले.

Chief Minister Eknath Shinde helped the woman injured in the rickshaw accident
IAS Pooja Khedkar| आयएएस पूजा खेडकरांच्या नियुक्तीवर वाद; वैद्यकीय सवलतींचे गैरवापर?

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीबद्दल या महिलेने त्यांचे आभार मानले. पण त्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे त्यांची संवेदनशील मुख्यमंत्री ही छबी पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुधवारच्या (दि. १०) या प्रसंगाचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत X अंकाउंटवर शेअर केला आहे. त्यात ते अपघातात जखमी झालेल्या एका वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस करताना दिसतात. विक्रोळीजवळची ही घटना आहे.

''ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघालो असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. यावेळी मी माझा ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच माझ्या ताफ्यातील रुग्णवाहिका आणि अधिकारी सोबत देऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.'' असे मुख्यमंत्री शिंदे यांनी X ‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या प्रसंगाच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे अपघातात जखमी झालेल्या महिलेला स्वतः रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाताना दिसतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news