

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुंबईला भेट दिली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ख्रिस्तोफर लक्सन यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये विविध विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.
यावेळी प्रमुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे, द्विपक्षीय संबधांना बळकटी देण्यावर चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टवरून दिली आहे. त्यांनी लक्सन यांना मुंबईतील दौऱ्यासाठी शुभेच्छाही दिल्या.