OBC Reservation| सरसकट मराठा ओबीसीत घुसवल्यास आंदोलन करू

छगन भुजबळ यांचा सरकारला इशारा
Chhagan Bhujbal
छगन भुजबळ file photo
Published on
Updated on

मुंबई : कोणाला काय द्यावे, हा सरकारचा प्रश्न आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र, ओबीसीमध्ये सरसकट मराठा समाजाचा समावेश केल्यास, राज्यव्यापी आंदोलन करण्याचा रइशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिला आहे. मुंबईत सोमवारी आयोजित केलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आम्हीही उद्या, मंगळवारपासून ग्राम, तालुका व जिल्हा पातळीवर आंदोलन करणार आहोत. गरज पडल्यास ओबीसीसुद्धा मुंबईत मोठ्या संख्येने येतील, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. जो शेती करतो तो कुणबी, या व्याख्येला भुजबळ यांनी विरोध केला. ते म्हणाले, ब्राह्मण, जैन, पारशी, मारवाडी बांधवसुद्धा शेती करतात. यावरून त्यांना कुणबी म्हणता येणार नाही.

ओबीसीमध्ये 374 जाती आहेत. आता सरसकट मराठा त्यामध्ये घुसविल्यास मूळ कुणबी समाजावर अन्याय होईल. मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वीच्या राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या नकाराबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. तरीही सरसकट मराठा ओबीसीमध्ये घातल्यास आम्ही दुसर्‍या दिवशी न्यायालयात जाऊ, असे त्यांनी सांगितले आहे. त्यावर राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. तसेच, सरसकट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेशही केला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला दिल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news