Finance Ministry Row : "हिवाळी अधिवेशनापूर्वी..." : अर्थखात्याबाबत मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचाही पुनरुच्चार
Chhagan Bhujbal on Finance Ministry
छगन भुजबळPudhari News
Published on: 
Updated on: 

Chhagan Bhujbal on Finance Ministry NCP : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अर्थ खाते होते. आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत अर्थखातं मागितलं. अर्थखाते आम्हाला द्यायला हवे यावर चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनापूर्वी यावर निर्णय घेण्‍यात यावा, अशी आम्‍ही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसलाच अर्थखाते दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि. २५) दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आम्हाला अर्थखातंच पाहिजे, हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय अपेक्षित

यावेळी भुजबळ म्हणाले की, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. राष्ट्रवादीच्या वाट्याचं अर्थखातं आम्ही मागितलं. या बैठकीत अर्थखातं मिळण्याबाबत चर्चा झाली. अन्य कोणतेही खाते आम्हाला नको आहे, हेही स्पष्ट केले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळावे, अशी मागणी करण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या बदलाबाबत कोणतीही चर्चा नाही

आजच्या बैठकीत राष्ट्रवादीतील फेरबदल किंवा राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कोणाचेही मंत्रीपद बदलले जाणार नाही. आजच्या बैठकीत केवळ अर्थखातं मिळण्याबाबत चर्चा झाली, असेही भुजबळांनी नमूद केले.

विलीनीकरण केवळ अफवा

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या केवळ अफवा आहेत. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, असा पुनरुच्चार करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर कोणतीही बैठक झालेली नाही, असेही भुजबळ म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news