Central Railway Train Derail Dombivli: डोंबिवलीत ट्रेन रूळावरून घसरली; सेंट्रल रेल्वे लाईनवरील वाहतूक मंदावली

Central Railway Train Derail
Central Railway Train Derail Central Railway Train Derail
Published on
Updated on

Central Railway Train Derail In Dmbivli :

सेंट्रल रेल्वे ट्रेन डोंबिवली पीएफ १ इथं रुळावरून घसरली आहे. याचा परिणाम कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रेल्व वाहतुकीवर झाला असून रेल्वे वाहतूक मंदावली आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग मंदावल असून या घटनेचा परिणाम हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणाऱ्या गांड्यावर देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांनी त्या प्रमाणे त्यांच्या प्रवासाची आखणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे.

Central Railway Train Derail
SGNP Train: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ट्रेन बंद; वन विभाग प्रशासनाकडून तांत्रिक कारण

इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे हाल

दरम्यान, रविवारी मेगा ब्लॉक असूनही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा झाल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आसनगाव ते ठाणे आणि पुढे पनवेल असा लांबचा प्रवास करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचे होते. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या सीईटी परीक्षेचे रिपोर्टिंग सकाळी ७:३० वाजता होते, तर साडेआठ वाजता गेट बंद होणार होते.

या वेळेचे नियोजन करून शेकडो विद्यार्थी पहाटेच स्थानकावर हजर झाले होते. मात्र, ऐनवेळी पहिलीच गाडी रद्द झाल्याची घोषणा झाल्याने विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ३ ते ४ तासांचा प्रवास असल्याने वेळेत पोहोचू की नाही, या चिंतेने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.

Central Railway Train Derail
Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेवर आज-उद्या जम्बो ब्लॉक; कांदिवली-बोरिवलीदरम्यान वाहतूक प्रभावित

प्रवाशांचा संताप आणि रेल्वेची तात्पुरती मलमपट्टी

पहिली लोकल रद्द झाल्यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर मुंबईच्या दिशेने जाणारे चाकरमानीही संतप्त झाले. स्थानकावर प्रवाशांचा दबाव आणि गोंधळ वाढल्याचे पाहून रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर या गोंधळावर तोडगा म्हणून मध्य रेल्वेने नंदीग्राम एक्सप्रेसला आसनगाव आणि वाशिंद स्थानकावर तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला. या एक्सप्रेसमधून विद्यार्थी आणि नोकरदारांना पुढे रवाना करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news