Central Railway Sunday mega block : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी ब्लॉक नसेल
Central Railway Sunday mega block
मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉकpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहील. मुलुंड स्थानक येथून सकाळी 10.43 ते दुपारी 3.53 पर्यंत सुटणार्‍या डाऊन धीम्या व अर्धजलद ट्रेन, मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 पर्यंत सुटणार्‍या अप धिम्या व अर्ध जलद ट्रेन, कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन्स डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.ठाण्याकडे जाणार्‍या गाड्या निर्धारित डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुटणार्‍या व तेथे येणार्‍या सर्व अप व डाऊन धीम्या लोकल सेवा सुमारे 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत (पोर्ट लाईन वगळून) आणि पनवेल येथे सकाळी 11.05 ते संध्याकाळी 5.05 पर्यंत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ब्लॉक असेल.

पनवेल येथून 10.33 ते 5.07 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणार्‍या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 9.45 ते 3.44 पर्यंत पनवेल व बेलापूरकडे जाणार्‍या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील.

पनवेल येथून 11.02 ते 4.26 पर्यंत ठाणे कडे जाणार्‍या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून 10.01 ते 4.24 पर्यंत पनवेलकडे जाणार्‍या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल रद्द केल्या आहेत. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे -वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. पश्चिम रेल्वेवर मात्र रविवारी ब्लॉक नसेल त्यामुळे दिलासा मिळाला .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news