

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
Central Railway mega block | विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेने रविवार (२० एप्रिल) मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. यावेळी ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्ग साडेपाच तास अप आणि डाऊन दिशेने बंद राहणार आहे. लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावतील. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक नाही.
सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ सेवा बंद राहील. ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून १५.५७ वाजता सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून ०९.१३ वाजता, तर ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण येथून १५.१० वाजता सुटेल.
ठाणे ते वाशी, नेरुळदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० (५.०० तास).
ठाण्याहून वाशी, नेरुळ, पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३५ ते संध्याकाळी १६.०७पर्यंत रद्द राहतील.
पनवेल, नेरुळ, वाशी ते ठाणे अप हार्बर मार्गावरील सेवा १०.२५ वाजता वाशी ते नेरुळ १६.०९ वाजता रद्द करण्यात येतील.