

मुंबई : मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 11.05 ते 15.55 पर्यंत रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार असलने लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा धावतील.
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत सुटणार्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणार्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत सुटणार्या बेलापूर/पनवेलला जाणार्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत ठाण्याला जाणार्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेल येथे जाणार्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
भायखळा स्थानकावर डीएसएस पॉईंट क्र. 127ए चे 52 किलो विभागाचे 60 किलो विभागात रुपांतर करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार/रविवार मध्यरात्री 00.30 ते पहाटे 04.30 वाजेपर्यंत परळ ते भायखळा दरम्यानच्या अप जलद मार्गावर ब्लॉक राहील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील. शिवाय पोर्ट लाइन सेवाही उपलब्ध असतील.