Mumbai Railway Block | लोकलचा आज-उद्या नाईट ब्लॉक; वाहतूक पूर्णपणे राहणार बंद

गाड्यांच्या वेळांत बदल
mumbai local Megablock
लोकलचा ब्लॉकFile Photo
Published on
Updated on

मुंबई : ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाच्या गर्डर उभारणीच्या कामासाठी आज, शनिवार आणि उद्या रविवार १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे प्रवाशांचा होणारा खोळंबा टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेत गर्डर उभारणीचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. या ब्लॉकदरम्यान मेन लाईनवर भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.

दक्षिण मुंबईत ब्रिटीशकालीन पुल आहेत. हे पुल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने ते पाडून नवीन पुल उभारणीचे काम रेल्वे आणि महापालिका करीत आहे. मस्जिद बंदर येथील लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्याने तो जमीनदोस्त करण्यात आला. मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे संयुक्तपणे पुलाची पुनर्बाधणी करीत आहे. रुळांवर गर्डर उभारण्यासाठी महापालिकेने मध्य रेल्वेकडे ब्लॉकची मागणी केली होती. त्यानुसार आता दोन नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते एसएमटी स्थानकांदरम्यान अप डाऊन धिम्या, जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. मेन लाईनच्या अप-डाऊन मार्गावरील लोकल कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंत, तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यंतच धावणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news