

मुंबई : मुंबईमध्ये भरधाव वेगात गाडी चालवून अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. वांद्रे - वरळी सी लिंकवर 252 किमी वेगाने लॅम्बोर्गिनी ऊरस गाडी चालवण्याचा प्रकार बुधवारी घडला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी खार पश्चिम येथील अदनवाला या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला व कार जप्त केली.
अहमदाबाद येथील नीरव पटेल यांच्या मालकीची ही गाडी असून हरियाणाची पासिंग आहे. त्यांनी गाडी कारडिलर असलेल्या अदनवालाला दिली होती. वांद्रे वरळी सी लिंकवर 80 किमीची वेग मर्यादाही आहे. तरीही अदनवालाने 251 किमी वेगाने कार चालवली व याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला.