

ठळक मुद्दे
कंपन्यांना आठवड्यात ४८ तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नाही.
कामगार मंत्री आकाश फुंडकर : कामगार आणि उद्योग क्षेत्रातील नियम सुलभ होऊन पारदर्शकता वाढण्याचा दावा
कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले
Workers will now have to work 12 hours instead of 9.
मुंबई : राज्य सरकारने कामगारांच्या कामाच्या तासात प्रचंड वाढ केली आहे. ९ ऐवजी कामगारांना यापुढे १२ तास काम करावे लागणार आहे. यावरून आठवड्याच्या कामकाजाचे तास ४८ वरून ६० तास होणार आहेत.
बुधवारी (दि.3) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने कायद्यातील काही तरतुदी दुरुस्तीला मान्यता दिली आहे. या दुरुस्ती अंतर्गत कलम ५४ मध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कलम ५५ मध्ये विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीची तरतूद करण्यात आली आहे. यातील कलम ५६ मध्ये आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. तसेच कलम ६५ मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
फुंडकर म्हणाले, कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्यासंबंधीचे बदल यात सुचविण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या धोरणाअंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्वाचे आहेत. या बदलांमुळे उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळेल तर कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजाचे वातावरण उपलब्ध होणार आहे.