

मुंबई : बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी असलेल्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशासाची 50 टक्के पर्सेंटाईल गुणांची अट काढण्यात आली आहे. यामुळे प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली असून, 28 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
परिचारिका अभ्यासक्रमाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी आणि महाविद्यालयातील जागा रिक्त राहू नये यासाठी भारतीय परिचर्या परिषदेने बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार प्रवेशासाठी आवश्यक असलेली अट काढून टाकण्याचा निर्णय भारतीय परिचर्या परिषदेने घेतला आहे. त्यामुळे बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासासाठी सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्वच विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार आहेत. सीईटी गुणांची अट शिथिल करताना भारतीय परिचर्या परिषदेने इयत्ता बारावी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) आणि इंग्रजी या विषयातून 45 टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची अट कायम ठेवली आहे.
नव्याने पात्र ठरणार्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी व शुल्क भरण्यासाठी 28 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबर ते 1 अॅाक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. नव्याने नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली असून, 28 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.