

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्ती रोखण्याच्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका आज (दि. ९) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, आमची न्यायालयीन लढाई सुरु राहिल. या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची दिलेल्या यादीवर सर्वप्रथम निर्णय व्हावा. त्यानंतर आलेल्या यादीचा विचार केला जावा,अशी याचिका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.