मुंबई | कॅन्सरग्रस्त महिलेला २५व्या आठवड्यात गर्भपाताची परवानगी - उच्च न्यायालय

गरोदरपणामुळे उपचारात येत होत्या अडचणी
Abortion Rights of Cancer Woman
कन्सरने आजारी असलेल्या गरोदर महिलेला न्यायालयाने उपचारासाठी गर्भपाताची परवानगी दिली आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उच्च न्यायालयाने कॅन्सरने पीडित असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. ही महिला २५ आठवड्यांची गर्भवती आहे. संबंधित महिलेला कॅन्सरचे उपचार घेता यावेत यासाठी उच्च न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नीला गोखले यांनी हा निर्णय दिला आहे. ही महिला गरोदर असतानाच तिला स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले असल्याचे न्यायमूर्तींनी नमुद केले आहे. तसेच गर्भपात केला तर मातेच्या जीवाला धोका नसल्याचा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांनी दिला होता, हा मुद्दा न्यायालयाने विचारात घेतला.

Summary
  • गरोदर असताना झाले होते कॅन्सरचे निदान

  • गरोदरपणामुळे किमोथेरपी अशक्य

  • गर्भपातामुळे महिलेच्या जीवाला धोका नसल्याचे डॉक्टरांचे मत

महिलेला पुनरुत्पादन अधिकार

न्यायमूर्तींनी म्हटले, "याचिकाकर्त्या महिलेला पुनरुत्पादन अधिकार आणि त्याबद्दलचे स्वातंत्र्य आहे. तिचा तिच्या शरीरावर अधिकार आहे, आणि निवडीचा अधिकार आहे. या स्थितीत टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे मेडिकल बोर्ड आणि याचिकाकर्ती महिला हिच्याकडे असलेले पर्याय लक्षात घेता आम्ही गर्भपाताची परवानगी देत आहोत." असे लाईव्ह लॉने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

या संदर्भात उच्च न्यायालयाने २ जुलैला केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांची समिती स्थापन करून त्यांचा अहवाल घेतला होता. ही महिला गरोदर असतानाच तिला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. तर गरोदरपणामुळे तिच्यावर किमोथेरपी देता येत नाही, असे डॉक्टरांनी म्हटले होते.

मेडिकल बोर्ड आणि याचिकाकर्ती महिला हिच्याकडे असलेले पर्याय लक्षात घेता आम्ही गर्भपाताची परवानगी देत आहोत.

मुंबई उच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news