दाऊद व्यक्तिगत दहशतवादी, त्याच्या टोळीतील सदस्यांना UAPA लागू होत नाही - मुंबई उच्च न्यायालय

ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना जामीन मंजुर
bombay hc dawood uapa offence
कायद्यातील तरतुदींनुसार दाऊद इब्राहिम हा व्यक्तिगत दहशतवादी आहे, न्यायालयाने म्हटले आहेFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा व्यक्तिगत दहशतवादी आहे, त्यामुळे त्यांच्या टोळीतील सदस्यांवर UAPA अंतर्गत कारवाई होऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) अंतर्गत कारवाई केलेली होती, आणि हे दोघे दाऊद टोळीशी संबंधित आहेत, असा पोलिसांचा दावा होता. या दोघांना जमीन मंजुर करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे. (Bombay HC Dawood UAPA offence)

निकालात काय म्हटले आहे?

न्यायमूर्ती भारती डंगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या पीठाने हा निर्णय दिलेले आहे. न्यायमूर्ती म्हणाले, "या कायद्यातील कलम २० हे दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असलेल्याबद्दल कारवाईसाठी आहे. पण दाऊद इब्राहिम कासकर याला या शेड्युल ४ नुसार वैयक्तित दहशतवादी घोषित केलेले आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती दाऊद किंवा डी गँगशी संबंधित आहे, त्याला हे कलम २० लागू होणार नाही." लाईव्ह लॉ या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.

Dawood Ibradhim | दाऊदवर काय कारवाई झाली आहे?

केंद्र सरकार शेड्यूल १नुसार काही संघटना, टोळ्या यांना दहशतवादी जाहीर करते, तर शेड्युल ४ नुसार एखाद्या व्यक्तीला दहशतवादी जाहीर करते. UAPAच्या ४ सप्टेंबर २०१९च्या नोटिफिकेशननुसार दाऊदला शेड्युल ४ नुसार दहशतवादी जाहीर करण्यात आले आहे.

खटल्याची पार्श्वभूमी काय?

न्यायमूर्तींनी या प्रकरणी फैज भिवंडीवाला आणि परवेज वैद या दोघांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.

वैद आणि भिवंडीवाला या दोघांना २०२२मध्ये अटक केली होती. वैद हा दाऊद टोळीशी संबंधित आहे, आणि त्याने दाऊद टोळीतील एकाला २५ हजार रुपये पाठवले होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. दाऊदचा हस्तक अनिस इब्राहिम याचाही संदर्भ या खटल्यात देण्यात आला आहे. तर भिंडीवाला याच्याकडे ६०० ग्रॅम गांजा सापडला होता, पण तो दाऊदच्या टोळीशी संबंधित असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

bombay hc dawood uapa offence
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील ‘ही’ ३ मेंटाॅर माहीत आहेत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news