

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा गुहांच्या दिशेने प्रवास करणारी बोट उलटून १३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेव्हीच्या स्पिडबोटने वेगात धडक दिल्याने प्रवासी बोट उलटली आहे. संरक्षण दलांकडून रेक्स्यू ऑपरेशन सुरु असून या दुघटनेतून १०१ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन रेक्स्यू टिमकडून हे बचावकार्य सुरु आहे. समुद्राच्या बाजूने असणाऱ्या नाविकांची मदत पोलिसांनी घेतली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नेव्हीच्या नवीन बोटीला नवीन इंजिन होतं त्याचं टेस्टिंग सुरू होतं.त्यात काही बिघाड आल्याने नौदलाची बोट प्रवासी असलेल्या नीलकमल बोटीवर जाऊन थेट आदळली. बोटीतील 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून १३ जणांना मृत घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये ३ नौदलाचे असून बोटीमधील १० जण आहेत. तर २ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
१)महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही), २) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार), ३) मंगेश(NAD बोट वरील कामगार), ४) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट), ५) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट), ६) साफियाना पठाण मयत महिला, ७) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन, ८) अक्षता राकेश अहिरे , ९) अनोळखी मयत महिला, १०) अनोळखी मयत महिला, ११) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे , १२) दिपक व्ही,१३) अनोळखी पुरुष , अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.
दरम्यान मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने बद्दल शोक व्यक्त केला असून, सकाळपर्यंत मदतकार्य सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानी मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या
बोट अपघातात एकच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या बोट अपघात निद्धेश अहिरे वय वर्ष पाच याचा मृत्यू झाला आहे व तसेच त्यांचे आई-वडील यांचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाशिक वरून हे कुटुंब फिरायला आलं होत अशी माहिती समोर आली आहे.
गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाकडून जाण्यासाठी भाऊच्या धक्क्यावरुन नीलकमल नावाची बोट निघाली होती. यावेळी समुद्रातून दुसऱ्या बाजूने एक स्पीडबोट जात होती. यावेळी त्या स्पीडबोटचे नियंत्रण सुटल्याने ती बोट सरळ फेरीच्या बोटीवर येऊन जोरात आदळली. त्यामुळे फेरीची बोट बुडाली. या घटनेचा व्हिडीओ सद्धा व्हायरल होत आहे. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.