Karnataka Assembly Election
मुंबई
bjp yuva morcha : भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये खडाजंगी
मालाड; पुढारी वृत्तसेवा : bjp yuva morcha अंधेरी एमआयडीसी परिसरात भाजयुवा मोर्चाच्या वतीने मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
आंदोलकांना नियंत्रणात करताना आंदोलकांना किरकोळ मार लागला. त्यात भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांना हाताला आणि पायाला किरकोळ जखम झाली. त्यांनी आरोप केले की पोलिसांनी त्यांचे कपडे फाडले व लाठी चार्ज केला त्यात त्यांच्या हाताला आणि डोकयला किरकोळ मार लागून रक्त निघाले. तेजिंदर सिंग व भाजयुवा मोर्चा कार्यकर्त्यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

