BMC Election 2025: उद्धव ठाकरेंना धक्का? भाजपाचा मुंबई महापालिकेचा सर्व्हे समोर, 150 जागांवर महायुतीच्या बाजूने कल

Brihanmumbai Municipal Corporation ELection 2025: मतदारांचा अंदाज घेत महायुती म्हणूनच 227 जागा लढवणार
BMC Election 2025
मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्षPudhari Photo
Published on
Updated on

BMC Election 2025 BJp Latest Survey

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या जागावाटपाची बोलणी सुरू होण्यापूर्वीच भाजपने सर्र्वेेक्षणाचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात भाजपला किती जागा मिळतील याचा अंदाज समोर ठेवत ही बोलणी करण्याची व्यूहरचना भाजपने केलेली दिसते. त्यासाठीच भाजपाने मुंबईतील 227 प्रभागांत सर्व्हे केला आणि आता त्यानुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबई भाजपातर्फे आतापर्यंत तीन वेळा 227 प्रभागांचा सर्व्हे करण्यात आला. अलीकडे तिसरा सर्व्हे पार पडला. लोकसभा मतदारसंघानुसार हा सर्व्हे करण्यात आला. त्या त्या मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सर्व्हेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व्हेनंतर प्रत्येक जिल्ह्यातील कोअर कमिटीद्वारे संपूर्ण आढावा घेण्यात आला व तो मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांना सादर केला.

BMC Election 2025
Devendra Fadnavis : तुमच्या भाषणाने लोकांचे पोट नाही भरत

या सर्व्हेत प्रत्येक प्रभागातील 300 ते 400 मतदारांशी विविध माध्यमांतून संवाद साधण्यात आला. यात मतदारांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे, हे तपासण्यात आले. प्रभागातील प्रमुख प्रश्नांबाबतही माहिती जमा करण्यात आली. महिला व पुरुष मतदारांसह नवयुवक मतदारांचेही म्हणणे ऐकून घेण्यात आले. यात 150 पेक्षा जास्त प्रभागांत महायुतीच्या बाजूने कल असल्याचे दिसून आले. त्यामुळेच भाजपाने आता आपली भूमिका बदललेली दिसते. महापालिका निवडणुकीत 150 जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या भाजपाकडून आता 227 प्रभाग महायुती लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

BMC Election 2025
Bombay High Court: कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे हंगामी ठेवता येणार नाही, मुंबई हायकोर्टाना निर्वाळा

स्वतः मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही महायुती म्हणूनच भाजप निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करत 150 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा केला. कोणी किती जागा लढाव्यात, यापेक्षा मुंबई महापालिकेवर महायुतीचे सरकार यावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर महायुतीचाच बनेल. आम्हाला महापौर पदापेक्षा मुंबईचा विकास महत्त्वाचा आहे. आतापर्यंत महापौर शिवसेनेचा होता परंतु त्यांना त्यांचे अधिकार समजलेच नाहीत. त्यामुळे महापौर असूनही त्याच्या अधिकाराच्या चाव्या मातोश्रीच्या हातात होत्या. महायुतीत मात्र अशा चाव्या कोणाच्या हातात राहणार नाहीत. मुंबईचा विकास हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असे साटम म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news