पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी आज (दि. २०) जाहीर झाली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत देवेंद्र फडवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मनगुंटीवार, अमल महाडिक, राहुल आवाडे, श्वेता महाले, मोनिका राजळे, जया चव्हाण, मेघना बोर्डीकर, मंदा म्हात्रे यांच्यासह १३ महिलांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Elections 2024)