BJP protest Mumbai : काँग्रेसविरोधात भाजपचे टिळक भवनासमोर धरणे आंदोलन

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्‍वाखाली मोर्चा
BJP protest Mumbai
मुंबई : काँग्रेस विरोधात निघालेल्या मोर्चाचे नेतृत्‍व भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केले. यावेळी काँग्रेस विरोधात फलकबाजी करण्यात आली. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेसने केलेल्या ठिय्‍या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपने देशभर आंदोलन केले. मुंबईत टिळक भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्‍वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

टिळक भवनासमोर या मोर्चाने आंदोलन केले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्‍न केल्याचा आरोप यावेळी अमित साटम यांनी केला. राहुल गांधी यांनी आपले संपलेले राजकारण या निमित्ताने जिवंत करण्याचा प्रयत्‍न केला. राहुल गांधी यांनी परदेशात देशाच्या शत्रूंना केव्हा आणि कुठे भेट दिली याचा तपशील जाहीर करावा असे आव्हान साटम यांनी दिले.

BJP protest Mumbai
Congress protest Mumbai : काँग्रेसचा भाजपा कार्यालयावर मोर्चाचा प्रयत्न

भारत आर्थिक महासत्ता बनत असल्याने देशाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून कट रचला जात असल्याचा आरोपही साटम यांनी केला. या निदर्शनावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

BJP protest Mumbai
Pune FDA Action: एफडीएच्या धडक कारवाईचा पुण्यात मोठा परिणाम! हॉटेलमधून भजी गायब, मेन्यू बदलले; तरीही टपऱ्यांकडून नियमांना केराची टोपली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news