Vidhan Parishad Election | भाजपची यादी जाहीर

धैर्यशील कदम, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र राऊत यांना संधी
Vidhan Parishad Election |
Vidhan Parishad Election | भाजपची यादी जाहीर
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपने रविवारी रात्री आपल्या 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम आणि सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत

यामध्ये भाजपच्या वाट्याला 11, शिवसेना शिंदे गटाला 4 आणि अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुतीच्या जागावाटपचा फॉर्म्युला निश्चित होताच उमेदवारांच्या नावांबाबत उत्सुकता निर्माण झाली. अखेर रात्री उशिरा दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस हे दुपारनंतर राजधानी दिल्लीत दाखल झाले होते.

यादीनुसार सांगली-सातारा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे धैर्यशील कदम यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील, सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना संधी देण्यात आली. नांदेडमधून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय अमर राजूरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघात बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करून पक्षाने त्यांना सामावून घेतल्याचे संकेत दिले आहेत.

मतदारसंघ व उमेदवार

नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील जळगाव : नंदकिशोर महाजन सोलापूर : राजेंद्र राऊत नांदेड : अमर राजूरकर

अमरावती : प्रवीण पोटे पाटील वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर सातारा-सांगली : धैर्यशील कदम छत्रपती संभाजी नगर-जालना : सुहास शिरसाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news