BEST Bus Accident मजास येथे बेस्ट बस अपघातात दुचाकीस्‍वार गंभीर जखमी

एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
BEST bus accident in Majas
मजास येथे बेस्ट बस अपघातात दुचाकीस्‍वार गंभीर जखमी File Photo
Published on
Updated on

Biker seriously injured in BEST bus accident in Majas

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अंधेरी आगरकर चौक येथून महाकाली गुंफा येथे जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागील बाजूला मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिली. यावेळी हा युवक मागच्या चाकाखाली आल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रूग्‍णालयात दाखल करण्यात आले असून एमआयडीसी पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.

BEST bus accident in Majas
क्रिएटिव्ह जगात भारताच्या सर्जनशील वेव्हज् : पंतप्रधान मोदी

अंधेरी आगरकर चौक येथून महाकाली गुंफाकडे जाणारी बेस्ट उपक्रमाची खासगी बस क्रमांक ३३३ सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास मजास डेपो, मातेश्वरी, नेल्को सिग्नल येथे आली. यावेळी मोहम्मद अली रोड येथील रहिवासी इस्माईल सुरतवाला या (३५ वर्षीय) युवकाने बसच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. यावेळी बसचा मागचा टायर युवकाच्या डाव्या हातावरून गेला.

या अपघातात युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने अंधेरीच्या होली स्पिरिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून, त्याचा हात वाचवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न सुरू आहे.

BEST bus accident in Majas
Paresh Rawal | पवारसाहेब बोलले अन् 'तो' प्रश्न अवघ्या १० सेकंदात सुटला! परेश रावल यांनी सांगितला किस्सा

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच बेस्टचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सध्या अपघातग्रस्त बस एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभी आहे. या अपघाताची चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news