Riddhi Thakkar | बस्तर सफारीसाठी निघालेली बायकर रिद्धी ठक्करचा रस्ते अपघातात मृत्यू

Riddhi Thakkar |
Riddhi Thakkar | बस्तर सफारीसाठी निघालेली बायकर रिद्धी ठक्करचा रस्ते अपघातात मृत्यू
Published on
Updated on

मुंबई : बस्तरच्या सफारीसाठी निघालेली मुंबईची २४ वर्षीय बायकर रिद्धी ठक्कर हिचा छत्तीसगडमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ती कांदिवली (पश्चिम) येथील रहिवासी आहे.

देशातील विविध भागांतील २३ महिला बायकर्सचा एक ग्रुप छत्तीसगडमध्ये एकत्र आला होता. या ग्रुपमध्ये २० मोटरसायकली आणि एक कार होती. सर्वजणी रायपूरहून बस्तरच्या दिशेने जात होत्या. बुधवारी पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास ग्रुपमधील बहुतांश बायकर्स पुढे निघून गेल्या होत्या. रिद्धी आणि काही महिला बायकर्स मागून येत होत्या. याचदरम्यान धमतरी-बालोद सीमेवरील मार्काटोला-जगतरा घाट परिसरात रिद्धीच्या मोटरसायकलला ट्रेलरने जोरदार धडक दिली.

रिद्धी ठक्कर ही सोशल मीडियावर सक्रिय होती. तिचे इन्स्टाग्रामवर १८,००० हून अधिक फॉलोअर्स होते. रिद्धीने बस्तरची सफर सुरू करण्यापूर्वी अवघ्या १५ तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. लेट्स एक्सप्लोर बस्तर’ असे तिने म्हटले होते. उत्साहाने सुरू झालेल्या या प्रवासादरम्यानच तिच्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे ही तिची शेवटची पोस्ट ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news