मुंबई
Bhaskar Jadhav Vs Sachin Kalyanshetti : राज्य विधीमंडळाच्या चालू अधिवेशनादरम्यान विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. एका कर्मचाऱ्याला रागावताना भास्कर जाधव यांनी वापरलेल्या शब्दांवरून हा वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले.