Bhaskar Jadhav | मुख्यमंत्र्यांनी नेहमीच माझ्‍याकडे लक्ष्‍य द्यावे : भास्‍कर जाधवांचा टोला

दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने नारायण राणेंना भीती वाटतेय
Bhaskar Jadhav vs Thackeray Sena leaders
भास्कर जाधवpudhari photo
Published on
Updated on

माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो. आम्‍हाला निधी देण्‍याबाबतही मुख्यमंत्र्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्‍यावी, असा टाेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (दि. १) माध्‍यमांशी बाेलताना लगावला.

माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो

"भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे हे ते स्वत: सांगू शकतात. सध्या कविता, शेरोशायरी यातून ते आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. आता त्यांचे नवीन स्टेटस येईल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधा, असे मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी माध्‍यमांशी बोलताना म्‍हणाले हाेते. यावर बोलताना भास्‍कर जाधव म्‍हणाले की, माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्यावी. आम्हाला निधीही देत राहावा. आम्‍हाला निधी देण्‍याबाबतही मुख्यमंत्र्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्‍यावी".

Bhaskar Jadhav vs Thackeray Sena leaders
नारायण राणे यांच्या मुलांसारखी मुलं कुणाच्या पोटी असू नयेत : भास्‍कर जाधव

विरोधी पक्षनेतेपदासाठी सरकारने पुढाकार घ्‍यावा

विरोधी पक्षनेतेपदावर बोलताना ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या सहमतीने माझे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे आले आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी सभागृहातील सदस्यसंख्येची १० टक्क्यांची अट असणे हे चुकीचे आहे. याबाबत मी सचिवांकडून माहिती घेतली असून, घटनेतही तशी तरतूद नाही. सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला हे पद देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांची आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा," अशी मागणीही त्यांनी केली.

Bhaskar Jadhav vs Thackeray Sena leaders
Nilesh Rane : निलेश राणेंचा पुन्‍हा भास्‍कर जाधवांवर हल्‍लाबाेल, “त्‍यांचा स्‍वभाव…”

मला यापुढे राणे कुटुंबीयांबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका

नारायण राणे यांना आता मनसेचा पुळका येत असेलही;पण मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्‍यांच्‍यावर केलेली टीका पाहा.आता राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा आपण स्वतः एवढे पक्ष का सोडले याचे उत्तर द्यावे, असा सवाल करत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची चोच नेहमी नरकातच असते. राणेंच्या मुलाने माझ्या टीकेला कोणत्या भाषेत उत्तर दिले हे सर्वांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर गेली दहा वर्षे सातत्याने टीका करणाऱ्या राणे यांना आता दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने भीती वाटत. राणे कुटुंबीयांबद्दल मला यापुढे कोणतेही प्रश्न विचारू नका," असेही भास्‍कर जाधव यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news